RIP म्हणजे काय ? हिंदूंनी RIP म्हणणे योग्य की अयोग्य?

                 
              कोणाचा मृत्यू झाल्यानंतर आपण लगेच RIP म्हणतो तर RIP म्हणजे काय  आणि RIP चा इतिहास वाचा थोडक्यात..


             ज्यांना मृत्यूनंतर जमिनीत गाडले जाते त्या ख्रिश्चन धर्माच्या बांधवांत RIP म्हणण्याची प्रथा आहे. पण मूळात RIP म्हणजे Rest in peace हा शब्दप्रयोग बर्‍याचदा पारंपारिक ख्रिश्चन सेवांमध्ये मृत आत्म्यास शांतीने आराम करण्यासाठी प्रार्थना केली जाते तेव्हा वापरला जातो. हे 18 व्या शतकातील हेडस्टोनवर सर्वव्यापी बनले आणि एखाद्याच्या मृत्यूचा संदर्भ घेताना आज याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यातही आता ख्रिश्चनांमधील एक गट RIp म्हणायला विरोध करतोय कारण हे बायबलच्या विरोधात आहे अस त्यांचे म्हणणे आहे.

           REST IN PEACE म्हणजे काय तर 'शांतपणे पडून रहा.' हे मृतात्म्या तुझ्या शरीराला आम्ही जमीनीत 'गाडले' आहे तेव्हा कयामत दिवशी उपरवाला तुझा न्याय करेल. तर आता तू जमीनीत शांतपणे पडून कयामतच्या दिवसाची वाट पहा . कारण ख्रिश्चन धर्मात असं मानलं जातं की (the soul and body will be reunited on Judgment Day.) Judgment Day म्हणजे The Last Judgment or The Day of the Lord



               RIP चा अर्थ "Rest in peace" सुरुवातीच्या ख्रिश्चनांच्या थडग्यावर कोरलेला असायचा. विशेषत: कॅथोलिक, लुथेरन आणि अँग्लिकन संप्रदायामध्ये. "तो शांतपणे झोपतो" हे वाक्य कॅथोलिक चर्चच्या ट्रायडेटाईन रिक्वेर्म मासमध्ये बर्‍याच वेळा आढळयचे.

               हिंदूने धर्मात 'भावपूर्ण श्रध्दांजली' हा शब्द वापरतात. देव मृतात्म्यास सदगती देवो असे म्हणतात. का तर ही जी व्यक्ती वारली आहे ती पुण्यगतीस पावावी आणि त्यांचा पुढील जन्म घेण्याचा प्रवास निर्विघ्न पार पडावा यासाठी. एखादा सज्जन, पुण्यवान हिंदू मरतो तेव्हा देवाने त्यांना वारंवार जन्म मरणाचा; पुनर्जन्माचा फेरा न देता 'मोक्ष' द्यावा अशीही आपण प्रार्थना करतोच की ...

                हिंदूधर्मात मृत व्यक्तीला गाडत नाहीत. जाळतात. या जन्मातून जाळून आत्मा मुक्त करतात. पुनर्जन्मासाठी. हिंदू त्याला RIP कसे म्हणतील? कारण आत्मा सदगतीस गेला असे आपल्या धर्मात म्हणतात. आत्मा मुक्त झाला. पुढला जन्म प्रवास त्याचा नीट होवो असे म्हणतात. हिंदू आत्मा कोंडून, बांधून, गाडून ठेवत नाहीत. मुक्त करतात कारण मेलेल्या व्यक्तीने पुढला जन्म घ्यावा म्हणून. पण इतर धर्म जे 'गाडतात' ते मृतात्माला 'जमीनीत शांत पडून रहा' सांगतात. कयामतपर्यंत तुझी सुटका नाही असं सांगतात. पण मुळात प्राचीन काळी Rest in peace म्हणून प्रार्थना केली जात होती मेल्या नंतर आत्म्यास शांती लाभावी यासाठी पण. (When the phrase became conventional, the absence of a reference to the soul led people to suppose that it was the physical body that was enjoined to lie peacefully in the grave.) पण त्या प्रार्थनेचा संबंध नंतर शरीराशी जोडला गेला. आणि आता तर यावरूनही ख्रिश्चन गटांमध्ये वाद निर्माण झाला आहे. ते काय म्हणताय वाचा

"Thompson said that he regards "RIP" as a prayer for the dead, which he believes contradicts biblical doctrine."
"Wallace Thompson believes that the phrase 'RIP' is effectively a prayer for the dead and therefore un-Protestant"- BCC


Refrnc-. bbc.com ,bbc.co.uk.,The English Poetic Epitaph: Commemoration and Conflict from Jonson to Wordsworth


       महेश.....
          

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या