गांधीं भारतातून हद्दपार होतोय का?



             
आज प्रजासत्ताक दिनानिमित्त एका शाळेत गेलो होतो. तेथील हा व्हिडिओ

                 प्रश्न मुळात असा आहे की हे असंल काही मुलांच्या तोंडून ऐकणं बर दिसत का ?
 की हे नव्याने निर्माण केलेले देशभक्ती चे धडे आहेत ? की भारताला आता गांधींच्या विचारांवर चालण्याची गरज राहिलेली नाहीये?
               तसेही गांधीचा आता फक्त शाळांच्या भिंतींवर आणि सरकारी कार्यालयातच टांगण्यासाठी  उपयोग होतांना दिसतोय. बर कार्यालयात का असेना पण त्यांचा फोटो टांगतात तो कुठे तर पाठीमागच्या भिंतीवर म्हणजे अधिकारी त्यांना पाठ (येथे डुंगण हा शब्द जाणून बुजून टाळला)  दाखवून आपापले कामं करायला मोकळे. पहिल्यासारखे आता लोकं गांधींवर बोलतांना दिसत नाहीयेत किंवा ते मुद्दाम बोलण्याचे टाळत आहेत का ? काही दिवसांपासून आपण बघतोच आहोत की कश्या प्रकारे परिस्थिती या भारतात निर्माण झाली होती आणि काही ठिकाणी अजूनही आहे. ज्या देशाला गांधींचा देश म्हणून जगात ओळखले जात होते त्याच देशात त्यांच्या विचारांना मानणारे किती लोकं उरलेत ? सध्या तर कोणालाच त्यांची गरज उरलेली नाहीये अस दिसतंय.

आता प्रश्न असाय की शिक्षकचं विध्यार्थ्यांना गांधी शिकवायचं बंद करताय का? किंवा शिक्षकांनाच गांधी माहीत नाहीये.असे तिथं कित्येक प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झाले.

    एकीकडे वर्षानुवर्षे याच शाळेतुन आपल्याला गांधीच्या पावलांवर पाऊल ठेवायचं शिकवलं जातं होत. आता शाळांनी गांधी शिकवणे बंद केले की काय असाही प्रश्न उपस्थित होतो.

                         बाकी प्रजासत्ताक दिन चिरायू होवो..

                   महेश....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या