The Alchemist book review

                     शब्दांचा किमयागार म्हणून जगविख्यात असलेले पाउलो कोएलो (Paulo coehlo ) सर्वाधिक वाचक लाभलेला आधुनिक काळातील मोजक्या लेखकांपैकी एक आहेत. त्याचा सर्वाधिक लोकप्रिय झालेल्या Tha Alchemist या कादंबरीच्या 55 पेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवाद झालेला असून कोट्यवधी प्रतीच्या विक्रीचा उच्चांक या कादंबरीकच्या नावे आहे.



                                           The Alchemist 

                       "किसी चीज को अगर पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की  साजिश में लग जाती है."
    
                        The Alchemist वाचल्यावर या वाक्याची जाणीव आपल्याला सारखी सारखी होत असते. The Alchemist आपल्याला स्वप्न बघायला आणि त्या स्वप्नांवर प्रेम करायला शिकवते. काहीही झालं तरी आपण आपल्या स्वप्नाची साथ सोडता कामा नये. निसर्ग आपल्याला वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नल देत असतो. जीवन जगत असताना आपण बऱ्याच वेळा वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते. आणि त्या वेळेस आपल्याला नेमके काय करावे समजत नाही. कधी कधी इतके आपण उराशी बाळगून असलेल्या आपल्या स्वप्नांचा त्यागही करतो ते का तर आपण निसर्गाच्या सिग्नलला ओळखण्यास कमी पडतो. तर त्या निसर्गाच्या सिग्नलांना ओळखता यायला हवे. 

                The Alchemist ही कहाणी आहे अश्याच एका मेंढपाळाची ज्याला लहान पनापासून जग फिरायची फार हौस असते. या हौसेपोटी तो घरादाराला सोडून मेंढ्या चारतो. जगाच्या विविध भागांमध्ये त्याने आतापर्यंत आपल्या मेंढ्या चारल्या आणि अजूनही चारतो आहे आणि आपली जग बघायची हौस पण पूर्ण करतो आहे. त्याला पडलेले स्वप्न आणि ते पूर्ण करण्याच्या नादात सर्व मेंढ्या विकून आपले ध्येयाकडे जाताना वाटेत सगळे पैसे चोरी होऊनही तो त्यातून कसा मार्ग काढतो आणि आलेल्या अडचणींवर मात करून तो त्याला पडलेल्या स्वप्नाचा पाठलाग कसा करतो. रस्त्यात भेटलेली माणसे, निसर्गाने दिलेले सिग्नल ओळखून तो ध्येयापर्यंत पोहचतो. जेव्हा माणूस जवान असतो तेव्हा त्याला आपले ध्येय माहीत असते. स्वप्न पाहणे आणि ते पूर्ण करण्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. पण जस जसे वय वाढत जाते तसे तसे नकारात्मक विचार घेरत जातात आणि तेव्हा त्याला प्रत्येक काम अशक्य वाटायला लागले. जेव्हा तुम्ही एखादे ध्येय किंवा एखादी गोष्ट पूर्ण अंतकरणाने मिळवण्याचा प्रयत्न करता ध्यास घेता तेव्हा ते मिळवणे हेच तुमचे जीवनाचे अंतिम ध्येय बनते.

                The Alchemist  मध्ये तुम्हाला संघर्षाची कहाणी मिळेल. The Alchemist मध्ये तुम्हाला एक छोटी पण पण जराशी वेगळी प्रेम कहाणी मिळेल ज्यात प्रेमी आपल्या प्रेयसीवर जीवापाड प्रेम करूनही आपल्या ध्येयापासुन वंचित होत नाही. तो आपल्या प्रेयसीला आपले ध्येय आपले आपले स्वप्न सांगतो. प्रेयसीही त्याला त्याच्या ध्येयाच्या आड न येता तू आधी तुझे स्वप्न पूर्ण कर असे सांगते. जोपर्यंत तू तुझं स्वप्न पूर्ण करून मला घ्यायला येत नाहीस तोपर्यंत मी तुझी वाट बघेन मग कितीही काळ लोटला तरी चालेल असे वजन देते. The Alchemist तुम्हाला स्वप्नांचा पाठलाग करायला सांगतेच पण तो कसा करायचा हेही शिकवते. निसर्ग प्रत्येक अडचणीच्या वेळी आपली मदत करण्यासाठी तयार असतो फक्त आपल्याला त्याचे नियम आणि त्याने दिलेले सिग्नल ओळखता यायला हवेत.
                      मी वाचलेल्या कादंबऱ्यांपैकी इतकी सहज आणि सुंदर कादंबरी दुसरी नाही. आपले म्हणणे रसिकांपर्यंत पोहचवण्यात कादंबरी यशस्वी ठरते वाचकाला खेळवून ठेवणाऱ्या अश्या या अगदी सहज आणि सुंदर कादंबरीचे जग भरात कोट्यवधी चाहते आहेत

         एकदा नक्की वाचा.... The Alchemist

                              खालील पुस्तकावर क्लीक करून हे  पुस्तक आपण Amazon वरून खरेदी करू शकता फक्त Rs 151                👇            








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या