तुम्हाला चांगला लेखक बनायचं असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा...!

     
           लेखनप्रक्रिया सुरू करताना आधी स्वतः माहितीचे ग्रहण, आकलन आपल्याला असावे लागते.
आकलनासाठी पुनःपुन्हा वाचन, श्रवण व चिंतन करा. मनात निश्चित हेतू ठेवून, आत्मविश्वासाने
संदर्भ पुरेसे तयार झाल्यावर व भाषिक तयारी असल्यास लेखनास सुरुवात करा.




*लेखन का करावे ?

       लेखनाची गरज अभ्यास करण्यासाठी असते. लेखनाची गरज अध्ययनासाठी असते.
अध्ययन म्हणजे आकलन, चिंतन-विचार,त्यांचा आविष्कार व त्यांची तपासणी.
आकलन म्हणजे काय? आकलन म्हणजे समजणे, उमजणे, जाणवणे, पटणे, स्मरणात
राहणे, भिडणे होय. अभ्यासासाठी श्रवण, वाचन केले पाहिजे. मनाची
इच्छाशक्ती, रसिकता, संवेदनशीलता व आवड असली की अभ्यास
होतो. या प्रकारे अभ्यास केल्यास आकलनाचे कौशल्य आत्मसात
होते. लेखकाने जे सांगितले आहे किंवा आपल्याला जे सांगायचे
आहे ते थोडक्यात सांगता येणे ही आकलनाची खरी कसोटी आहे.
एखाद्या विषयाचे आकलन झाले आहे किंवा नाही ते कसे ठरवणार?

(१) विषयाचा नेमकेपणा (कोण काय कशाबद्दल या प्रश्नांची
      उत्तरे देता आल्यास)
(२) आशयाचे वेगळेपण (लेखकाचा हेतू, भूमिका, मांडणी या
       साऱ्यांत अप्रस्तुतापेक्षा प्रस्तुताचे वेगळेपण दिसल्यास)
(३) प्रतिपादनाचे मध्यवर्ती सूत्र (सुरुवात, शेवट,  यांच्या
      आधिक्यावरून)
(४) लक्षवेधक शब्द, वाक्प्रयोग, दृष्टांत, तक्ते, आलेख, चित्रे
      यांचा कुशल वापर
(५) परिचिताचे स्मरण - (पूर्वी अनुभवलेली, वाचलेली माहिती,
      कल्पना, प्रसंग आठवणे)
(६) व्यक्तीकरणाची घाई - (समजल्यावर चटकन लिहावे,
        बोलावे असे वाटते)

       लेखनाचे स्वयं-अध्ययनात, दैनंदिन व्यवहारात व स्वयं-
मूल्यांकनात महत्त्व आहे. काही गोष्टी दीर्घ काळ लक्षात राहाव्यात
म्हणून आपण लिहून ठेवतो. एखादा विषय स्वतःला पुरेसा स्पष्ट
होण्यासाठीही आपण लिहितो. लिहिण्यामुळे माणसाच्या विचारांना
स्पष्टता व विश्वासार्हता लाभते. व्यवहार सुकर व स्पष्ट होतो. एखादा
निरोप तोंडी वा फोनवर सांगण्यापेक्षाही प्रत्यक्ष लिहून
कळविल्यास त्यात नेमकेपणा, निश्चितता, सत्यता वाटते. काही
प्रसंगी तोंडी बोलण्यापेक्षा लिहिलेला मजकूर पुरावा म्हणूनही सादर
करता येतो. तो चिरंतन टिकतो. गेल्या तीनशे वर्षांत ज्ञानाचा /
माहितीचा प्रसार होण्यास लेखनच कारणीभूत झालेले आहे.
सारलेखन, निबंधलेखन, पत्रलेखन, वृत्तलेखन या प्रसंगी कराव्या
लागणाऱ्या लेखनाचा आपण विचार करणार आहोत. साहित्य-
लेखनाइतके प्रतिभेला महत्त्व नसते; पण किमान लेखनतंत्राचा
अवलंब केल्यास अपेक्षित ध्येय साध्य होऊ शकते.

* लेखनाचे महत्त्व

(०१) माहिती सुसूत्रपणे स्मरणात ठेवण्यासाठी,
(०२) पुनरावलोकनासाठी,
(०३) विचारांना निश्चितता, विश्वासार्हता व स्पष्टता
       लाभण्यासाठी,
(०४) माहिती दीर्घ काळ जतन करण्यासाठी,
(०५) माहिती मोठ्या प्रमाणावर व परिणामकारकरित्या
        प्रसारित करण्यासाठी,
(०६) प्रदर्शनास साहाय्य करण्यासाठी,
(०७) वेळ वाचविण्यासाठी,
(०८) व्यवहार सुकर, नेटका व व्यक्तिगत जवळिकेचा
(०९) आत्माविष्कार व स्वयंमूल्यमापनासाठी.

* लेखनातील अडचणी

लेखनकौशल्य आत्मसात करण्यासाठी त्याची तंत्रे जशी
माहिती करून घेणे आवश्यक आहे तसे कोणत्या अडचणी येतात
तेही पाहणे आवश्यक आहे.

(०१) लेखनासाठी आवश्यक ती मानसिक तयारी नसणे.
(०२) आत्मविश्वास नसणे किंवा दुसरा कोणी तरी तो सतत
        खच्ची करीत असतो.
(०३) न्यूनगंड वाटणे.
(०४) लिहिण्यायोग्य विषयच स्वतःजवळ नसणे.
(०६) लिहिण्याची निकड / गरज वाटत नसणे, लिहिण्यास पुरेसे
        / योग्य निमित्त न भावणे,
(०७) लिहिण्यापूर्वीच विषय नीरस / अनावश्यक वाटू लागणे.
(०८) स्वतंत्र लेखनाचा संस्कार बालपणापासून कधीही झालेला
       नसणे.
(०९) लिहून ठेवलेला मजकूर इतर वाचतील या जाणिवेमुळे
        लिहिण्याविषयी संकोच वाटणे. लिहिलेल्या मजकुराला कायदेशीरत्व
         प्राप्त होत असल्याने लिहून ठेवण्यासंबंधी सतत भीती वाटणे.
(१०) लिहायचे ते स्वतःसाठी का इतरांसाठी याविषयी संभ्रम वाटणे.
       लिहिण्याइतका पुरेसा वेळ नसणे.
(१२) लिहिण्याचे फार मोठे कष्ट वाटणे.
(१४) लिहिण्यासाठी आवश्यक ते परिश्रम करण्याची तयारी नसणे.
(१५) लिहिण्यासाठी पूर्वतयारी (विचार, पुरावे,उदाहरणे, आराखडा)
        केलेली नसणे.
(१७) लिहिण्याचे तंत्र / पद्धती परिचित नसणे.
(१८) लिहिण्यासाठी योग्य वातावरण, पुरेसे लेखनसाहित्य,जागा नसणे.

*अडचणी दूर करण्याचे उपाय

       वरील अडचणी लेखनकौशल्यास मारक ठरतात, म्हणून
त्या दूर करण्याचा प्रयत्न करा. लिहिण्यासाठी मनाची नेहेमी
होकारात्मक भूमिका ठेवा. पराभूत विचार मनात आणू नका.
अडचणी दूर केल्याच पाहिजेत, असा मनाशी ठरवून टाका.

आपल्या बाबतीत वरीलपैकी कोणत्या अडचणी आहेत
त्याचा शोध घ्या. त्या लिहन काढा. आपण लिहिलेल्या अडचणी
दुसऱ्या मित्रास दाखवा. त्याच्या अडचणीशी
आपल्या अडचणींची तुलना करा. त्यावर सामूहिक चर्चा करा.
अडचण दूर झाली आहे किंवा नाही ते पाहा. चर्चेतून मानसिक नैराश्य
होते व आत्मविश्वास वाढतो, मात्र कधी कधी याउलटही होण्याची
शक्यता असते. पण खचून न जाता मनोबल वाढवा. मनोबल बाह्य
प्रयत्नांपेक्षा स्वप्रयत्नानेच वाढते. यातील ९९% अडचणी मानसिक
व स्वप्रयत्नाने दूर होणाऱ्या आहेत हे लक्षात घ्या.जागा, वातावरण
ही तशी फार महत्त्वाची गोष्ट आहे. पण त्या बाबतीत तडजोड करून
घ्यावी. मनाला तशी सवय लावावी हे उत्तम.

*अजून काही उपाय

(१) मनोबल वाढवा..
(२) लिहिण्यापूर्वी मनाची होकारात्मक भूमिका ठेवा, मोकळ्या
      मनाने लिहा.
(३) लिहिण्याचा हेतू नक्की करून पुरेशी संदर्भसामग्री जमा करा.
     लिहिण्याचे तंत्र परिचित करून घ्या.लेखनाचे लक्ष्य निश्चित करून
     आराखडा तयार करा.
(६) पुरेसा वेळ द्या व आवश्यक ते परिश्रम करण्याची तयारी ठेवा.
(७) लिहिण्यासाठी सतत विषय शोधत रहा.
(८) स्वतःच्या अडचणी लिहून काढा. त्या इतरांस दाखवा. चर्चा
     करा. स्पर्धेचे वातावरण ठेवा व कामाला लागा.

* लेखनासाठी एकाग्रता महत्वाची असते.

       लेखन करावयाचे हे निश्चित केल्यावर त्यासाठी मानसिक
पूर्वतयारी करावी लागते. यासाठी आपले लक्ष सतत लेखनध्येयावर
ठेवणे आवश्यक आहे. लेखन करताना अनेक अडथळे येण्याची
शक्यता असते. लिहायला बसल्यावर अचानकपणे काही लोक येऊन
बसतात.गप्पांच्या ओघात लेखनविषय विसरला जातो. कधी अचानक
कोणाशीतरी वाद होतो. चित्त उडते. न्यूनगंड वाटू लागतो. नको
तेव्हा पेन बंद पडतो, रिफील संपते. याचा राग आपण लेखनावर
काढून लेखन थांबवितो. एका विषयावर लेखन चालू असताना
दुसऱ्या विषयावर लेखन करण्याचा मोह होतो, कधी सक्ती होते.
अचानक गरज वाटेनाशी होते. मन भरकटते. दुसऱ्याच उपविषयावर /
कमी महत्त्वाच्या विषयावर लिहिण्यासाठी मन धडपडू लागते. इतरांचा
मजकूर पाहून कधी स्वतःचेच विचार मध्येच घुसडावेत असे वाटते. लेखनात
सदोष हस्ताक्षर, छपाई यामुळेही लेखनावरचे लक्ष उडते. भावनिक विचारांची
कालवा काळवं होते त्यामुळे निश्चित विचारांच्या अभावामुळे सतत खाडाखोड
होऊ लागते. व्यक्तींचे लिहिण्यावर दडपण येते. वरिष्ठ किंवा अन्य व्यक्तींसमोर
लिहिण्याचा संकोच वाटतो. अशी मनाची एकाग्रता नाहीशी करणारी अनेक कारणे
आहेत.


लेख पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद...🙏


संदर्भ- ycmou अभ्यासक्रम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या